
वर्धा : वर्धा शहराला लागून असलेल्या नालवाडी येथील उभाड कुटुंबातील मुलीचा विवाह शहराच्या इव्हेंट या मंगल कार्यालयात आयोजित होता. एकीकडे विवाहाची जय्यत तयारी सुरू होती तर दुसरीकडे चोरटे आपला बेत साधण्यासाठी दागिने आणि रोकड वर नजर ठेवून होते. अश्यातच लग्नाच्या मुहूर्तावर चोरट्याने लहान मुलाचा वापर करीत दागिण्यासह रोकडची बॅग लंपास केली.
या घटनेनंतर आनंदात असलेल्या वरड्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. लग्न समारंभातील आनंदावर विरजण घालणाऱ्या या घटनेत चोरट्यानी एका दहा वर्षीय बालकाचा वापर केला. बाल गुन्हेगारी वाढविण्यास प्रवृत्त करणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आवाहन निर्माण केले आहे. सराईत चोरट्यांची ही टोळी मोठ्या शहरातील असावी अशी शंका पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
ही घटना सहा फेब्रुवारी रोजी घडली, असून पोलिसात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ८ तोळे सोन आणि एक लाख रुपये रोख असा एकूण 3 लाख 5 हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला, अशी माहिती सेवाग्रामच्या पोलीस निरिक्षक कांचन पांडे यांनी दिली. या घटनेमुळे उभाड कुटुंबाच्या रंगाचा बेरंग झाला. पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र, या घटनेने लग्नसोहळ्यात सावध राहण्याची गरज दाखवून दिली आहे.