अँप्लिकेशन इन्स्टॉल अन्‌ खात्यातून एक लाख लपास! दोघांकडून तरुणाची केली फसवणूक

वर्धा : पेटीएम कंपनीकडून आल्याचे सांगत तिघांनी लोनचे आमिष देत अँप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले असता तरुणाच्या खात्यातून तब्बल १ लाख रुपये परस्पर काढून घेत त्याची फसवणूक केली. याप्रकरणी २४ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, विलास नारायण चोपडे रा. देववाडी सारवाडी यांचे दुकान असून आरोपी राजेश मेश्राम रा. चंद्रपूर आणि त्याच्यासह अनोळखी व्यक्ती असे दोघे जण त्याच्या दुकानात गेले आणि पेटीएम कंपनीकडून आल्याचे सांगत पेटीएम मार्फत ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे ओडी अमाउंट वापराचे आमिष दाखवून मोबाइलमध्ये रॅपीपे नावाचे अँप्लिकेशन इन्स्टॉल करुन त्या ऑप्लिकेशनद्वारे विलासच्या नावावर असलेल्या बँकेच्या खात्यात ९५ हजार ५७५ रुपयांचे लोन घेऊन त्याला ती रक्‍कम परत वेगवेगळ्या खात्यात यूपीआय ट्रान्झॅक्शनद्वारे वळते करण्यास सांगून त्याच्या खात्यातून १ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलास चोपडे यांनी थेट सायबर पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here