चोरट्यांनी लांबवले दोन लाखाचे दागिने! त्रिमुर्तीनगर परिसरातील घटना

वर्धा : शहरासह आसपासच्या परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. घरी कुणीच नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पत्नीला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेलेल्या अमोल पद्माकर गोपाळ यांच्या घराला लक्ष्य करत 1 लाख 85 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना नजिकच्या त्रिमुर्तीनगर येथे आज शनिवार (ता. ३१) रोजी उघडकीस आली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोलच्या पत्नीची प्रकृती ठिक नसल्याने तिला मंगळवार 27 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घराला कुलूप बघून चोरट्यांनी रात्री दाराचा कोंडा तोडत घरात प्रवेश करुन 1 लाख 5 हजार रुपये किमतीची 42 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 32 हजार 500 रुपये किमतीचा सोन्याचा गोफ, 32 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचे कानातले तसेच सोन्याचे चाळ असा 1 लाख 85 हजारांचा ऐवज लांबवला.

अमोल गोपाळ यांना घटनेची माहिती दिली. गोपाळ यांनी घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली. रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जळक यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. घटनास्थळी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अमोल गोपाळ यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here