खून करून आईच्या शरीराचे तुकडे करणाऱ्यास फाशीची शिक्षा

कोल्हापूर : कावळा नाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने शरीराचे तुकडे करुन क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सुनील रामा कुचकोरवी (वर ३५) यास गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी त्यास दोषी ठरवले होते. कार्याची सीमा गाठणारा दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने न्यायालयाने ही कठोर शिक्षा देण्यात आली.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळा नाका परिसरातील अग्निशामक केंद्राच्या मागील वसाहतीमध्ये २८ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास संशयित सुनील याने आपली आई यल्लवा रामा कुचकोरवी (वय ६२) हिला दारू पिण्यास पैसे देत नाही. या कारणावरून चाकू, सुरी, सत्तूर अशा प्राणघातक हत्यारांनी खून केला होता. शेजाऱ्यांना चाहूल लागल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असता लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी तपास करून न्यायालयात संशयिताविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश (वर्ग ४) महेश जाधव यांच्या न्यायालयात सुरू होते.

याप्रकरणी १२ साक्षीदार तपासले. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने सुनील याला दोषी ठरवले. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर गुरुवारी न्यायालयाने सुनीलला दोषी ठरवले. त्याला जन्मठेप की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला होता. न्यायालयाने, गुरुवारी सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे नमूद करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here