पोलीस दलात बदलीचे वारे! ऐच्छिक ठिकाणासाठी ‘फिल्डिंग’; अनेकांचे अर्ज झाले प्राप्त : पारदर्शकपणे होणार सार्वत्रिक बदल्या

0
138

वर्धा : एकाच ठिकाणी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या तसेच मुदतपूर्व बदलीसाठी विनंती करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांच्या हालचालींना आता वेग आला आहे. त्यामुळे ऐच्छिक ठिकाणी नेमणूक मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी आपआपल्या पद्धतीने फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

एलसीबी, सेलू, वर्धा शहर पोलीस ठाण्यात नेमणूक होण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. मात्र, सर्व बदल्या या पारदर्शकपणे होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वर्धा जिल्ह्यात १९ पोलीस ठाण्यांपैकी टॅशन असलेल्या काही पोलीस ठाण्यांत नेमणूक व्हावी, यासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, एलसीबी आदी ठाण्यात जाण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे, तर कुटुंबाचे स्वास्थ्य, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी दररोज अपडाऊन होत नसल्याने अनेकांनी ऐच्छिक ठिकाणी बदलीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. पारदर्शकपणे बदल्या झाल्यास पोलिसांमध्ये उत्साह निर्माण होऊन नवी ऊर्जा मिळण्यास मदत होईल हे ही तितकेच खरे

या तीन ठिकाणांना पसंती अधिक…

स्थानिक गुन्हे शाखा

पोलीस कर्मचार्‍यांची पहिली पसंती ही स्थानिक गुन्हे शाखेला असते. या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचे कामकाज चालत असल्याने अनेक कर्मचारी या ठिकाणी काम करण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले आहे.

हिंगणघाट पोलीस स्टेशन

अनेकांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात नेपणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. पोलीस स्टेशनची हद्द मोठी आहे. शिवाय या भागात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीणच्या सीमिपर्यं हद्द असल्याने राष्ट्रीय महामार्गही हद्दीमध्ये येतात.

समुद्रपूर पोलीस स्टेशन

समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये नेपणूक होण्यासाठी देखील अनेकांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय प्रहामार्ग येत असून, सीपाही जवळपास असल्याने अनेकजण येथे जाण्यासाठी देखील इच्छुक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here