जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढी विरोधात निदर्शने: जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांचे नेतृत्व

वर्धा : राहुल गांधी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे संकल्प दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी मोदी सरकारने वाढविलेल्या जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीच्या प्रामुख्याने खाद्यतेलाच्या भाववाढी विरोधात इब्राहिमजी आदमजी गॅस एजन्सी तसेच बजाज चौक वर्धा येथे जोरदार नारेबाजी करुन निदर्शने करण्यात आली.

तसेच दिवसागणिक वाढणार्‍या जीवनावश्यक वस्तू भाववाढीच्या विरोधात माननीय एस.डी.ओ. वर्धा यांना वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी हेमलता मेघे जिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांनी नेतृत्व केले. यावेळी वर्धा जिल्हा महिला काँग्रेसच्या सोनाली कोपुलवार, शोभा सातपुते,मनीषा मान, प्रतिभा जाधव, वैशाली मेढेंवार, वृषाली काटे, संगीता ढवळे, अरुणा धोटे, शीला ढोबळे, आशा गुजर, वैशाली मेघे, सरोज सालबर्डे, अर्चना कश्यप, सपना परियाल, आशा भुजाडे, शीला गुजर, तब्बसूम आजमी, निमा फुलबांधे यांच्यासह महिला पदाधिकारी यांनी मोठ्या संखेने उपस्थिती दर्शवून सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करून मोदी सरकारच्या विरोधात संकल्प दिवस पाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here