रविवारी बाजापेठा सुरू राहतील! सर्व सेवाही सुरू राहील

वर्धा : कोरोना संसर्गामुळे दोन रविवारी बाजार बंद होता. परंतु रविवारी 7 मार्च रोजी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची संचार बंदी राहणार नाही. सर्व सेवा सुरळीत चालू राहतील. सर्वसामान्यांसह विविध व्यापारी संघटनांनीही रविवारी बंदला आक्षेप घेतला होता, त्यानंतर प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती आहे.

वर्धा शहरात आता रेकॉर्ड ब्रेक कोरोना रूग्ण होत आहेत. जिल्ह्यातील इतर भागात संक्रमित लोकांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलली होती, परिणामी प्रशासनाने गेल्या दोन रविवारी संचार बंदी लादली होती, त्याचा बाजारपेठेवर परिणाम होत होता. रविवारी बंद असल्याने शनिवारी बाजारात गर्दी वाढत होती त्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला होता.

रविवारी बाजारपेठ बंद न ठेवण्याची विनंती व्यापारी संघटनेने जिल्हाधीकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदन देऊन यावर चर्चा केली होती. शुक्रवारी वर्धा मार्केट बंद राहते रविवारी बंदमुळे बाजार बंद पडल्याने बाजारपेठेवर परिणाम होणार होता. आठवड्यातून दोन दिवस बाजारपेठ बंद राहील्याने एकाचवेळी लोकांची गर्दी वाढल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे रविवारी बंद न करण्याची विनंती लोकप्रतिनिधींनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here