अज्ञात वाहनावर धडकला मालवाहू! मालवाहूचालक किरकोळ जखमी

समुद्रपूर : जाम-नागपूर महामार्गावरील हळदगाव पाटीजवळ शुक्रवारी सकाळी ११.४४ वाजताच्या सुमारास भरधाव असलेल्या एम एच. ४० ए. के. ५६८८ क्रमांकाच्या मालवाहूने अज्ञात वाहनाला मागाहून धडक दिली, धडक होताच मालवाहूचा पुढील भाग चांगलाच चपकल्याने मालवाहू चालक रविंद्रकुमार वसंतकुमार मरकाम (१९) रा. नागपूर हा वाहनात अडकला. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रेलरच्या सहाय्याने अपघातत्रस्त वाहनात अडकेल्या मरकाम याला वाहनाबाहेर काढले. यात अपघातात मालवाहूचालक किरकोळ जखमी झाला असून मालवाहूचे मोठे नुकसान झाले आहे. जखमीला समुद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here