दुचाकीच्या धडकेत युवक झाला जखमी! प्रकृती चिंताजनक

विरुळ (आकाजी) : फिरायला गेलेल्या युवकाला दुचाकीने जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. जखमीचे नाव प्रतीक रत्नाकर बेकडे (वय 26) असून, त्याला प्रकती चिंताजनक असल्याने नागपूर येथील मेडिकलमध्ये हलविण्यात आले आहे. येथील बसस्थानका लगत भोयर ले-आउटमध्ये नव्याने घर बांधून जेमतेम एक-दीड महिन्यापूर्वी आपल्या आईसोबत प्रतीक राहायला आला होता. नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण झाल्यावर प्रतीक हा मित्रासह बसस्थानक परिसरात रात्री दहा-साडेदहाच्या दरम्यान फिरायला गेला होता.

तेवढ्यात गौरखेडा गावाहून मद्यधुंद अवस्थेत दिनेश गणेश चाफले (वय 26) रा डोरली हा स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परत जात होता. दारूच्या नशेत बेधुंद होत विनालाइट व नंबर प्लेट नसलेली गाडी चालवत डोरली गावाकडे जात होता. दरम्यात त्याने प्रतीकच्या अंगावर गाडी नेली. यात प्रतीक खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर मार लागल्याने त्याला सेवाग्राम येथे रेफर करण्यात आले. प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्याने प्रतीकली दुपारी नागपूर येथील मेडिकला हलविण्यात आले. परंतु त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here