टोमॅटोचे भाव कडाडले! 60 ते 80 रु. किलोने विक्री

वर्धा : साधारणतः दोन महिन्यांपूर्वी टोमेटोला चांगला भाव नसल्याने कित्येकांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले तर काही विक्रेत्यांनी 10 रु. किलोप्रमाणे विकले. रक्‍त जाळून घेतलेले पीक फेकून देताना शेतकरी चांगलाच हळहळला. मात्र, आता तेच टोमॅटो चेहऱ्यावर हसू आणणारे ठरत आहे. टोमॅटोचे दर कडाडले असून 60 ते 80 रु. किलोदराने टोमॅटोची विक्री होत आहे.

सध्या महागाईने कहर केला असून सर्वच वस्तूंचे दर वधारले आहे. जीवनावश्यक वस्तुची वाढ नागरिंकांच्या जिव्हारी गली आहे. त्याचा धसका गृहिणींनी घेतला आहे. आता सोबतच रोजच्या जेवणातील टोमॅटोचे भाव कडाडल्याने टोमॅटोचा वापर डोळयात पाणी आणणारा ठरत आहे. भाव वधारल्याने नागरिकांनी सध्यातरी टोमॅटोच्या चटणीचा स्वाद चाखायला मिळणार नाही हेही खरे! किराणा साहित्य व भाजीपाला चांगलाच महागला आहे. त्यात आता दररोजच्या वापरातील टोमॅटो वधारल्याने एवढे महाग टोमॅटो विकत घेताना विचार करावा लागतो. टोमेंटोचे वाढलेले दर सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here