
राहुल खोब्रागडे
वर्धा : देशभरात कोविड-19 महामारीचा कहर पाहायला मिळाला ऑक्सिजनच्या कमतरतेने अनेक रुग्णांचे मृत्यू झालेले आहे. ऑक्सिजनचा एकमेव स्त्रोत असलेल्या हजारो वृक्षांची रस्ता चौपदरीकरणाच्या कामात कत्तल झाली मात्र रस्त्याचे बांधकाम पुर्ण होऊन दोन वर्षे लोटूनही सर्त्याच्या दुतर्फा झाडे लागलेली नाही. जी झाडे लावण्यात आली त्यांची देखभाल करण्यात आली नसल्याने ती नष्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वृक्ष तोडीमुळे बातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमी दूर करणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करने गर्जेचे होते मात्र संबंधीत विभागाकडून तसे झाले नाही. नावापुरते काही प्रमाणात झाडे लावण्यात आली परंतू त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने ती नष्ट झाली. वर्धा नागपुर माहामार्गालगत केलेल्या वृक्ष लागवडीतील अनेक झाडे पाण्याअभावी सुकली तर बहुतांश झाडांना लावलेली सौरक्षण कठडे चोरट्यांनी चोरुन नेत लोहालोखंडच्या भारोभार विकल्याने उघडी पडलेली झाडे जनावरांनी नष्ट केली. संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे.
चार वर्षापुर्वी वर्धा-नागपुर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाकरीता या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाटसरुंना गर्द सावली आणि मोठ्या प्रमानावर ऑक्सिजन देणार्या हजारो कडूलिंबाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. परिणामी या मार्गावर आता एकही झाड शिल्लक नसल्याने उन्हाच्या तडाख्यात वाहनचालकांचा जीव कासाविस होतो. रस्त्यावर कुठेही झाड शिल्लक नसल्याने दुचाकीने किंवा पायदळ जाण्यार्या वाटसरुंना उन्हाळ्यात क्षणभर्याचाही विसावा या रस्त्याने घेता येत नाही. उन्हाळ्यात सुर्य आग ओकतो आणि खालून सिमेंट कॉक्रेटचे रोड तापत असल्याने जीवाची लाही लाही होत असताना दिसते.
रोडचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या दोन्ही बाजुला काही प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली होती मात्र या झाडांच्या संगोपणाच्या जबाबदारीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आल्याने यातील अर्धेअधिक झाडे पाण्याअभावी वाळलीत तर अनेक झाडे जनावरांच्या पायाखालील तुडवल्या गेलीत. रोडची कामे पुर्ण होऊन जवळपास दोन वर्षाचा कालावधी पुर्ण झाला या कालावधीत रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडे डैलात उभी असने अपेक्षीत होते मात्र तसे झाले नाही.
झाडांची योग्य पद्धतीने निगा राखण्यात आलेली नसल्याने झाडांची वाढच झाली नाही. या वृक्षांच्या सौरक्षनाकरीता लावण्यात आलेली कठडे अनेक दिवसापासुन रस्त्याच्या कडेला पडुन होते आता ती दिसून येत नाही. चोरट्यांनी ही कठडे चोरुन नेत लोहालोखंडच्या भारोभार विकल्याची माहिती सामोर येत आहे. जी झाडे कशीतरी जगली त्या झाडांना गेल्या कित्तेक महिन्यापासुन पाणी मिळालेले नाही. सर्य आग ओकत असल्याने यातील बहुतांश झाडे आता शेवटच्या घटका मोजत आहे.
संबंधीत विभागाकडे या वृक्षांच्या संगोपणाची जबाबदारी देण्यात आली असली तरी या विभाग निद्रीस्त अवस्थेत आहे. वृक्षलागवडीतील किती झाडे जगतील याची काहीच माहिती नाही. या वृक्षांची योग्य पद्धतीने जोपासना करण्यात आली असती तर आज रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे बहरतांना दिसुन आली असती. या काळात अनेक झाडे वाळलीत अनेक झाडांनी माना टाकल्यात मात्र अंद्यापही त्यांना वाचवीण्यासाठी संबंधीत विभागाकडून कोणतेच प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही. ऑक्सिजनसारख्या अतिमहत्वाच्या संवेदनशिल विषयाबाबद प्रशासनाने याची दखल घेत संबंधीतावर कारवाई करावी आणि तात्काळ वृक्षलागवडीची मोहिम यशस्विरीत्या पार पाडावी अशी मागणी वृक्षप्रेमींकडुन होत आहे.
प्रतिक्रीया…
वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. प्रदुषणावर मात करण्याकरीता वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही त्यामुळे नागरीकांनी प्रदूषणमुक्त हवा देणाऱ्या झाडांची घरोघरी लावून प्रदूषणाचा स्तर कमी करणे गरजेचे आहे. नागरीकांनी जांभूळ, चिंच, आंबा, बकुळ, जास्वंद, सीताफळ, निवडुंगाचे, पेरू आदी झाडे ही आपल्यासाठी जीवनदायी वृक्ष आहे.या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड होने काळाची गरज आहे.
मुनेश्वर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य पवनारवृक्षारोपणाच्या बाबतीत शासन गंभीर नसल्याचे दिसुन येते संबंधीत विभागांच्या कार्यालयातुन वृक्षलागवडीचा केवळ आकड्यांचा खेळ चालत असतो कागदोपत्रीच वृक्षलागवड केली जाते प्रत्येक्षात परीस्थीती काही वेगळीच असते. वृक्षलागवडीचा केवळ दिखावा करण्याचा प्रयत्न केला जातो हा प्रकार थांबण्याची आता गरज आहे.
प्रविण चाटे, नागरीक पवनार


















































