वर्धा जिल्ह्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट; तीसहून अधिक मजूर भाजले

वर्धा: भूगाव येथे असलेल्या उत्तम गाल्वा मेटॅलिक लि. या केमिकल फॅक्टरीत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्फोट होऊन तीसहून अधिक मजूर भाजल्याची घटना घडली आहे.या स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समोर आले आले नाही. दरम्यान सर्व जखमी मजुरांना सावंगी येथील दत्ता मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सावंगी ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे आपल्या चमुसह घटनास्ताली दाखल झाले आहे. ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here