मोहता इंडस्ट्रीजचा जागा विकण्याचा प्रयत्न इंटक हाणून पाडेल! इंटक महासचिव आफताब खान यांचा निवेदनातून इशारा

वर्धा : कोरोना काळात शासनाने लावलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान दिलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून मोहता इंडस्ट्रीज बंद करून सदर गिरणीची जागा विकण्याचे प्रयन्त रचणाऱ्या मोहता इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकांचे षडयंत्र इंटकच्या माध्यमातून हाणून पाडू असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे महासचिव आफताब खान यांनी निवेदनातून दिला आहे.

या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार,सदर गिरणी ही १०० वर्षा पासून सुरू आहे. सद्या स्थितीत या गिरणीत ५७० कामगार काम करीत आहेत. गिरणी व्यवस्थापकांनी इंटक या मान्यताप्राप्त युनियनशीँ कोणतीही चर्चा न करता गिरणीची ताळेबंदी करण्याचा एकतर्फी निर्णय घेतलेला आहे.

सदर गिरणी बंद करून गिरणीची काही जागा ही विकण्याचा प्रयन्त करीत असल्याचे खात्रीलायक रित्या समजते. मोहता इंडस्ट्रीजच्या लॉक आऊटच्या निर्णया विरुद्ध इंटकने औधोगिक न्यायालय व उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल केलेल्या याचिकेत अशी विनंती केली आहे की, गिरणीतील काम करणाऱ्या कामगारांचा पूर्ण हिशोब झाल्याशिवाय कंपनीला जमीन विकण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे.

व्यवस्थापकांनी परस्पर जमीन विक्रीचा सौदा केल्यास तो न्यायालयाचा अपमान होईल त्यामुळे कोणीही हा व्यवहार केल्यास इंटकच्या वतीने याची तक्रार ईडी, आयकर विभाग व अन्य आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या संस्थांकडे करू अशी माहिती त्यांनी दिली.

मोहता इंडस्ट्रीजकडे असलेल्या थकबाकीबाबत भारतीय स्टेट बँकेने नॅशनल कंपनीला ट्रीबन्यूलच्या (NCLT) कोर्टात सुद्धा खटला दाखल केलेला आहे. तसेच हिंगणघाट नगर परिषदेचा सुद्धा सर्वोच्च न्यायालयात आक्ट्राय संदर्भातील बाकी रक्कमे बाबत खटला सुरू आहे.तसेच याबाबत कामगारांचे कोट्यवधी रुपये घेणे बाकी असल्याने नप ने विक्री बाबत या गिरणीला ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये असे निवेदन सुद्धा दिलेले आहे. तरीही कोणीही जमिनीचा व्यवहार करू नये अशी विनंती महासचिव आफताब खान यांनी निवेदनातून केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here