
संजय धोंगडे
सेलू : लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या बारभाई गणेश मंडळाला १२१ वर्षाची परंपरा आहे त्या काळात सेलूतील काही मान्यवरांनी एकत्र येत गणेश मंडळाची स्थापना केली तेव्हापासून ची ही परंपरा तेवढ्याच श्रध्देने आणि भक्तिभावाने आजही नवीन पिढीतील तरुण मंडळी जोपासत आहे यावर्षीला कोरोणाचे संकट पाहता शासकीय नियमांचे पालन करत साधेपणाने गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.
इंग्रज राजवटीत स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र करून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात केली त्याकाळात सन 1899 मध्ये लोकमान्य टिळकांनी सेलूत आल्यानंतर स्वातंत्र्य लढयाला गती येईल यादृष्टीने सभा घेतली या सभेला बारा जण उपस्थित होते स्वातंत्र्याचा लढा तिव्र करण्यासोबतच त्यांनी येथे या कामाचा श्रीगणेशा केला त्याचे उपस्थितीत गणेशाची स्थापना करून या मंडळाला बारभाई गणेश मंडळ असे नाव दिले तेव्हापासून बारभाई गणेश मंडळ रूढी परंपरा व धार्मिकता जोपासत आपले कार्य जोमाने पुढे नेण्यासाठी हिरीरीने झटत आहे. यावर्षी कोरोणामुळे महाप्रसाद व इतर कार्यक्रम रद्द केले आहे.