जिल्हयातील नगर पालिकांचे अंतिम प्रभागनिहाय आरक्षण जाहिर

वर्धा : जिल्हयातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी (रेल्वे) या नगर परिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेच्या आरक्षणास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. अंतिम प्रभाग रचना आरक्षण प्रसिध्द करण्यात येत आले आहे. वर्धा नगरपरिषदेतील प्रभाग क्र.16, 17 व 20-अ अनुसुचित जातीसाठी राखीव, प्रभाग क्र.4, 15 व 19-अ अनुसुचित जातीच्या महिलांसाठी राखीव, प्रभाग क्र.12-अ अनुसुचित जमाती, प्रभाग क्र. 6-अ अनुसुचित जमाती स्त्रियांसाठी राखीव, प्रभाग क्र. 1 ते 11 ब, 13 ते 15, 18 व 19-ब सर्वसाधारण आणि प्रभाग क्र.1 ते 3, 5, 7 ते 14-अ, 16, 17, 20-ब व 18-अ सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

हिंगणघाट नगर परिषदेतील प्रभाग क्र. 8, 9, 15-ब अनुसुचित जातीसाठी राखीव, प्रभाग क्र.1, 6, 20-अ अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव, प्रभाग क्र.10-अ अनुसुचित जमाती राखीव, 18-अ अनुसुचित जमाती महिला राखीव, प्रभाग क्र.1 ते 7, 11 ते 14, 16 ते 20-ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.2 ते 5, 7 अ, 8 ते 10 ब, 11 ते 17 अ, 19-अ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव.
आर्वी नगर परिषदेतील प्रभाग क्र. 3-अ अनुसुचित जाती, 2 व 12-अ अनुसुचित जाती महिला, 4-अ अनुसुचित जमाती, प्रभाग 1, 2, 5 ते 11-ब, 12-क सर्वसाधारण राखीव, 1-अ, 3,4-ब, 5 ते 11-अ व 12-ब सर्वसाधारण महिला राखीव.

पुलगाव नगरपरिषदेतील प्रभाग क्र. 3, 4, 10-अ अनुसुचित जाती, 2,8,9-अ अनुसुचित जाती महिला, 1-अ अनुसुचित जमाती महिला, 1, 2, 5 ते 9-ब सर्वसाधारण, 3, 4-ब, 5 ते 7-अ, 10-ब व 10 क सर्वसाधारण महिला राखीव. देवळी नगर परिषदेतील प्रभाग क्र. 1-अ अनुसुचित जाती, 2 व 3-अ अनुसुचित जाती महिला, 10-अ अनुसुचित जमाती महिला, 2 ते 10-ब सर्वसाधारण, 1-ब, 4 ते 9 अ सर्वसाधारण महिला राखीव. सिंदी (रेल्वे) नगर परिषदेतील प्रभाग क्र. 9-अ अनुसुचित जाती, 10-अ अनुसुचित जाती महिला, 1-अ अनुसुचित जमाती, 2-अ अनुसुचित जमाती महिला, 2 ते 8-ब व 10-ब सर्वसाधारण, 1-ब, 3 ते 8-अ व 9-ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सदर यादी संबंधित नगर परिषदेच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here