उज्ज्वलाच्या ४९ हजार २०४ लाभार्थ्यांना मिळणार गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त! केंद्राच्या निर्णयामुळे बँक खात्यात वळती होणार सबसिडी

वर्धा : पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहे. अशातच शनिवारी केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ व ६ रुपयांनी कपात केल्याने पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलिंडरवर २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केल्याने याचा वर्धा जिल्ह्यातील ४९ हजार २०४ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. एकूणच आता उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त मिळणार असून सबसिडी बँक खात्यात वळती होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here