कंञाटी आरोग्यसेविकांचे आंदोलन! अन्यायकारक परिपत्रक रद्द करा; प्रशासनाला दिले निवेदन

वर्धा : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंञाटी नर्सेस युनियनच्यावतीने शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर अन्यायकारक परिपञकांची होळी करीत सेवेचे 15 वर्ष परत द्या, अन्यायकारक परिपञक रद्द करा, या मागणी आयटकचे राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे यांच्या नेतत्वात धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

मागील 15 वर्षांपासून अत्यंत कमी मानधनावर कंञटी आरोग्य सेविका यांची राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियुक्‍ती करण्यात आली होती. मागील 10 वर्षांत नियमित आरोग्य सेविकांचे रिक्त पदे भरण्यात आले नसून आरोग्याचा डोलारा कंञाटी आरोग्य सेविका सांभाळत आहेत. केंद्र सरकारने राज्यातील 597 कंञाटी आरोग्य सेविका पदाचा निधी कमी दिल्यामुळे चुकीचे कारण देवून वर्धा जिल्ह्यातील 22 कंञाटी आरोग्य सेविकासह राज्यातील 597 महिलाची सेवा संपुष्टात आणणे अन्यायकारक आहे.

ज्या उपकेंद्राची प्रसुतीसंख्या मागील वर्षभराच्या काळात शुन्य आहे तेथील आरोग्य सेविकांची सेवा समाप्त करावी, हा निकष अन्यायकारक आहे. कारण मागील 2 वर्षांपासून विभागाने उपकेंद्रात प्रसुती करु नये. अशा सूचनादिलेल्या होत्या. गेली दोन वर्ष आरोग्य सेविकांना प्रधान सचिव यांच्या पत्रानुसार फक्त कोविडचे कामकाज करण्यासाठी सुचित केले होते. त्यामुळे सर्व 597 कंत्राटी आरोग्य सेविकांना न्याय मिळणे आवश्यक आहे. आंदोलनात संगीता रेवडे, भारती मून, प्रतीक्षा धाबर्डे, ज्योती भारती, कविता येडमे, शारदा आळेवार, सपना तळवेकर, जयश्री देवढे, मनोषा महाबुध्दे, सिमा हिवंज, ललीता वाघ, सरला पारिसे, हुसना बानो, शेक ममता बसू, मिनाक्षी नगराळे, नंदा रोडे, सारिका कीरडे, संगीता मांढरे, संगीता खळतकर, वैशाली येसनकर, साधना परतेकी, चंदा कमरे, शालीनी घरडे, ललीता क्षीरसागर, शालू बरखडे, उमा घाडगे, सरला अडसर, संध्या रामटेक, सरोज वानखेडे, रत्नमाला कामडी, साधना परतेकी इत्यादी शेकडो सेविका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here