विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या! प्रेमासाठी विवाहितेने सासर सोडले; प्रियकराने आत्महत्येस प्रवृत्त केले

चिकणी (जामणी) : जन्मदात्याने मोठ्या थाटात मुलीचा विवाह लावून दिला; मात्र लग्नापूर्वीच्या प्रेमाने विवाहितेला हाक दिली अन्‌ प्रियकरासाठी विवाहितेनेही सासर सोडले; मात्र प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

चिकणी परिसरातील रहिवासी शंकर दिगांबर पोजगे यांनी त्यांच्या मुलीचे दोन महिन्यांपूर्वी पडेगाव येथील सतीश बकाले याच्याशी मोठ्या थाटात विवाह लावून दिला होता; मात्र त्याचवेळी आरोपी शैलेश शेलेकार रा. माणिकवाडा धनज याने विवाहितेशी मोबाइलवर बोलणे सुरू केले. तुझ्याशी लग्न करतो, नवऱ्याला सोडून दे, असे म्हणत तगादा लावला. अखेर विवाहितेने पडेगाव येथून माहेरी कळंब येथे शैलेशला भेटायला गेली. यावेळी विवाहितेने लग्नाची गळ घातली; मात्र, शैलेशने लग्नास नकार दिल्याने विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here