जनावरांची अवैधरीत्या वाहतूक! एकास अटक आठ जनावरांची सुटका; अल्लीपूर पोलिसांची कारवाई

वर्धा : अवैधरित्या मालवाहू वाहनात निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आठ जनावरांची अल्लीपूर पोलिसांनी सुटका करीत चालकास अटक केली. हिंगणघाट ते अल्लीपूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी हिंगणघाट अल्लीपूर रस्त्यावर नाकाबंदी लावली असता एम.एच.३४ ए.बी. मालवाहू वाहन भरधाव येताना दिसले. पोलिसांनी वाहनाला अडवून तपासणी केली असता आठ जनावरें कोंबून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी जनावरांसह मालवाहू असा एकूण ४ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत चालक राजू नाना शिरसाठा रा. हिंगणघाट यास अटक केली, ही कारवाई अल्लीपूर पोलिसांनी केली असून तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here