जिल्हयातील 36 वाळूघाटाचा लिलाव! ईच्छुकांनी ऑनलाईन निविदा सादर कराव्यात


वर्धा : सन 2021-22 या वर्षाकरीता जिल्हयातील 36 वाळूघाटाचा लिलाव ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. यासाठी ईच्छुकांनी ऑनलाईन निविदा सादर कराव्यात. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

लिलाव होणा-या घाटांमध्ये देवळी तालुक्यातील आपटी, हिवरा (का), टाकटी चना, सोनेगाव बाई व टाकळी दरणे, आर्वी तालुक्यातील दिघी-वडगाव, सायखेडा व सालफळ समुद्रपूर तालुक्यातील शिवणी, सेवा, चाकुर, मनगाव, मेनखात, मांडगाव, उमरा, औरंगपूर (रिठ), पारडी, उमरा, बरबडी हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दा), चिकमोह, टेंभा-पारडी, चिंचोली बु, खारडी-भारडी, काजळसरा, गणेशपूर, बोरखेडी, भगवा, शेकापूर बाई, नांदरा रिठ, सावंगी रिठ, धोची, हिवरा, ढिवरी पिपरी व सोनेगाव(धोची) अशा 36 वाळूघाटाचा लिलाव 13 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी 4 जानेवारी पासुन ऑनलाईन पध्दतीने नोंदणी सुरु होणार असून 10 जानेवारी रोजी नोंदणी बंद होणार आहे. तसेच 12 जानेवारी रोजी ऑनलाईन पध्दत बंद होऊन 13 जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here