पहिल्याच पावसात रस्त्यांची पोलखोल! रस्त्यांवर डबके तयार

कारंजा (घा) : पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यांवर डबके तयार होऊन ठिकठिकाणी चिखल तयार झाल्याने वाहनचालक, पादचाण्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

१० जूनला मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली. यामुळे शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर तळे साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. चिखलामुळे घसरगुंडी तयार होऊन दररोज अपघाताला आमंत्रण पिळत. आहे. शहरातील पंचायत समिती ते वर्धा जिल्हा परिषद कर्मचारी बँकेपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडून पाण्याचे डबके तयार झाले आहे. अगोदरच अरुंद रस्ता व त्यातच पाणी आणि चिखलामुळे जीवघेणी घसरगुंडी अशी अवस्था झाली आहे.

बसस्थानक परिसरातही अनेक खड्ट्यांत पाणी साचून चिखलामुळे चालणेही अवघड झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. आरोग्यविषयक अडचणींमुळे नागरिकांत भीती आहे. साचलेल्या पाण्यांमुळे डासांची उत्पत्ती होत. रोगराई पसरण्याची भीती असल्याने रस्त्यांची दुरुस्ती करण्यासोबतच निर्जंतुकीकरण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शहरात कित्येक वर्षांपासून खुल्या असलेल्या भूखंडांवरही कचऱ्याचे साम्राज्य असून डबके तयार झाले आहे. भूखंडधारकांना नोटीस बजावून स्वच्छता करावयास लावण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here