जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहार कार्यकर्त्यांकडून गळफास घेण्याचा प्रयत्न

वर्धा : जिल्ह्यातील पुनर्वसन, प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या शेतामधून अवैध उत्खनन या गंभीर विषयाकडे वारंवार प्रशासनाला निवेद देवूनही कोणतीच दखल घेतल्या गेली नसल्याने आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्रहारने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयातच गळफास घेण्याचा प्रयत्न करीत आंदोलन कले.

जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील नवरगाव येथील सहा वर्षांपूर्वी गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते, त्या गावकऱ्यांना अद्यापही कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नसून प्रशासनाला याबाबत माहिती सुद्धा देण्यात आली होती. तर आर्वी तालुक्यातील पिपरी पारगोठाण येथील गाव निम्न वर्धा प्रकल्पात गेले असून, तेथील रहिवासी असलेले रमेश किसन गेटमे यांची शेत व घर प्रकल्पात गेल्यामुळे त्यांना भूखंड मिळाला नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना २१ वर्षांपासून कुठल्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. व एस कुमार कन्स्ट्रक्शन ठाणे यांनी रस्त्याच्या कामाचा कंत्राट घेतला असून, वर्धा येथील महाराष्ट्र औद्योगिक परिसरात असलेल्या मडावी व इतर शेतकऱ्यांच्या शेतामधून करार करीत एस कन्स्ट्रक्शन यांनी मुरुमाचे उत्तखन्न करण्यात आले होते.

त्या बदल्यात माती आणून टाकणार असल्याचे करार पत्रकात नमूद करण्यात आले असूनही एस कन्स्ट्रक्शन यांनी शेतात माती टाकली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले होते. तीन मुद्यांविषयी प्रहारकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आले होते. कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रहार कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. आश्वासन देण्याचा कार्यकाळ समाप्त होताच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात दिनांक १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना
प्रलंबित असलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन करीत निवेदन देण्यासाठी दालनात गेले असता, पडेगाव येथील सूरज घायवट या कार्यकर्त्यांने जिल्हाधिकारी यांच्या दालना पुढील नावाच्या फलकाला दोराने गळफास लावून ‘मला मरायचे नाही… वाचवा’ असे फलक हातात घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.

या गळफास आंदोलनाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची भंभेरी उडाली होती. पोलीस प्रशासनाला या आंदोलना विषयी माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात धावपळ झाली होती. या अभिनव आंदोलनात चंद्रशेखर मडावी, नावेद पठाण, प्रीतम कातकिडे, सिराज पठाण, अमित खंडारे, शुभम भोयर, भूषण येलेकार, ऋषिकेश पाचकवडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here