कारच्या धडकेत युवक ठार! एक गंभीर

आकोली : वर्धा- नागपूर रोडवरील इव्हेंट सभागृहाजवळ झालेल्या कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत आकोली येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. त्यातील गंभीर जखमी झालेला महेंद्र माणिक मरस्कोल्हे (वय 38) हा युवक सेवाग्राम येथील दवाखान्यात मरण पावला. तर सुनील माईदे (वय 32) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

यवतमाळकडे जाणाऱ्या एम. एच. 32 ए. एस. 1290 क्रमाकांच्या चारचाकीने इव्हेंट सभागृहाकडे येत असलेल्या एम. एच. 32 एस. 8424 या दुचाकीला धडक दिली. यात आकोली येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सेवाग्राम पोलिसांनी अपघाताची नोंद करून जखमाींना सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात भरती केले आहे. यातील महेंद्र माणिक मरस्कोल्हे (वय 38) याचा उपचारादरम्यान, मुत्यू झाला. तर सुनील माईदे (वय 32) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, सेवाग्राम पोलिस स्टेशनचे पीएसआय कदम तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here