साफ करून देण्याच्या बहाण्याने त्या दोघांनी सोन्याचे दागिने पळविले! पवनार येथील घटना

पवनार : घरातील तांबे, पितळेची भांडी साफ करून देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून विश्वास संपादन केला. सोबतच सोन्याचेही दागिने साफ करून देतो, असे सांगून दागिने आणायला लावले. त्यानंतर नजरचुकतून ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना वॉर्ड क्रमांक २ मध्ये शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजताच्या दरम्यान घडली.

अनुसया नेवारे यांच्या घरी पितळ आणि तांब्याची भांडी उजळून देण्याच्या बहाण्याने दोन व्यक्‍ती आल्या, सुरुवातीला त्यांनी तांबे, पितळेची भांडी चकाचक करून विश्‍वास संपादन केला. त्यानंतर सोन्याचे दागिने आणण्यास सांगितले. त्यामुळे अनुसया नेवारे व त्यांची सून गौरी या दोघींनीही दोन मंगळसूत्र व तीन कानातले असे साडेतेरा ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर गॅसवर पाणी गरम करून त्या पाण्यात हळद टाकल्यावर दागिनेही टाकायला लावले. त्यानंतर दोघींचेही लक्ष विचलित करून त्यातील दागिने लंपास केले. पाणी थंड झाल्यावर त्या पाण्यात दागिन्यांचा शोध घेतला असता दिसून आले नाहीत. त्यामुळे फसगत झाल्याचे लक्षात येताच आरडाओरड करण्यात आली. पण, तोपर्यंत दोन्ही चोरटे पसार झाले. होते. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांना माहिती दिली असता जमादार संजय लोहकरे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here