वनपरिक्षेत्र कार्यालयातील चंदनाचे झाड केले ल॑पास! वनविभागात उडाली खळबळ

तारासावंगा : आष्टी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात असलेले चंदनाचे झाड परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्याने तोडून व चोरून नेलेल्या चंदनाच्या झाडाची किंमत 30 हजारांच्या घरात असून या घटनेमुळे अवैध वृक्षकत्तल करणाऱ्यांची हिम्मत चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी तोडले. चोरटे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी तोडलेल्या चंदनाच्या झाडाचे खोड मोठ्या हुशारीने घटनास्थळावरून लंपास केले. सकाळी ही बाब वनविभागाच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्याने याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍याला दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here