ग्रापं. चा बनावट शिक्का करून घोळ! कंत्राटदाराचा प्रताप; मदनी ग्रामपंचायतीमधील प्रकार

वर्धा : मदनी ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का तयार करून कोऱ्या लेडर पॅडवर सचिवाची खोटी स्वाक्षरी करून कंत्राटदाराने शासनाची फसवणूक केली. ही घटना 17 मार्च रोजी मदनी येथून उजेडात आली आहे. मदनी ग्रामपंचायतीच्या सचिव सारिका कवडुजी चौधरी यांनी आरोपी भूषण अवचट याच्याविरुद्ध तक्रार दिली.

त्यात आरोपीने ग्रामपंचायत मदनी येथील बांधकामाचे कंत्राट अनेकवेळा घेतले होते. आरोपीकडे ग्रामपंचायतीचे कोरे लेटर पॅड, सही व शिक्का होता. त्यावरून आरोपीने बनावट कार्यादेश टाइप करून सही व ग्रामपंचायत मदनीचा शिक्का मारून सदरचा आदेश वरिष्ठ कार्यालयात सादर केला व शासकोय कामात घोळ केला. तसेच दुस-या कंत्राटदाराला काम दिले, असे म्हणून खोट्या बातम्या प्रसारित करू: ग्रामपंचतीच्या सचिवाची बदनाम केली. सारिका चौधरी यांच्या तक्रारीवरून भूषण अवचट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here