
देवळी : तालुक्यातील दिघी बोपापुर गावातील शेतकऱ्यांनी नापिकीमूळे आपल्या शेतातील सोयाबीन पिकामध्ये गुरे चरायला सोडल्याती घटना घडली आहे.
परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक पूर्ण खराब झाले, शेंगा मधून कोंब निघाले व काही सोयाबीन जागीच सडून खराब झाली, म्हनुन शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून चार महिने पोटच्या पोरा प्रमाणे वाढवलेल्या अत्यंत मेहनत व खर्च करून उभे केलेले पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया गेले त्यामुळे उभ्या पीकामध्ये गुरे चरण्यासाठी सोडण्याची वेळ शेतकर्यांवर आलेली आहे.
दिघी गावातील दिलीपराव दिघीकर, रवींद्र दरने, अरविंद नाखले, संदीप दिघीकर, भास्कर दिघीकर, गजानन पोहणे या शेतकऱ्यांनी पिकामध्ये गुरे चरण्यास सोडली.
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी किमान २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.


















































