वाहनधारकांंची पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्याकरीता गर्दी! लॉकडाउनच्या काळात नागरीक पेट्रोल भरुन जातात तरी कुठे असा प्रश्न

वर्धा : जिल्ह्यात १८ मे पर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली दवाखाने व मेडिकल वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला मात्र तरीही नागरीक आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याकरीता पेट्रोल पंपवर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वच सेवा बंद राहनार असतांना वाहनात पेट्रोल भरुन लॉकडाउनच्या काळात नागरीक जातात तरी कुठे असा प्रश्न आता अनेकांना पडलेला आहे.

जिल्ह्यात कडक लॉकडाउन घोषित केल्याने शहरातील सर्वच पेट्रोलपंप बंद आहेत मात्र महामार्गावरील पेट्रोल पंप चालू असल्याने नागरीकांनी आपला मोर्चा आता तीकडे वळवीलेला आहे. कान्हापुर लगत असलेल्या पेट्रोल पंपवर नागरीक रोज पेट्रोल भरण्यकरीता झुंबड करीत असल्याचे दिसून येत आहे. या पंपावरुन पेट्रोलची विक्र सूरु असल्याने येथे वाहनधारक तासनतास पेट्रोल भरण्याकरीता रांगा लावत गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here