
सिंदी रेल्वे : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रहीवाशी शिक्षक व त्याची सून कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
शहरातील केसरीमल नगर विद्यालय जवळील प्रभाग क्र ७ मधील रहिवासी असलेले ५५ वर्षीय शिक्षक व त्याची सून वय २४ वर्षे तब्बेत बरी नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. शिक्षकाची ड्युटी सध्या हमदापूर येथे सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारावर लक्ष ठेवण्यासाठी लावली असल्याने तेथूनच त्यांना लागण झाल्याची शक्यता वैधकीय अधिकऱ्यानी वर्तविली आहे. त्यांच्या २ मुलांची व पत्नीची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याने त्यांना घरीच होम कोरोंटाइन करून ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे बुधवारी (ता.२६) घराशेजारीच महालक्ष्मी निमित्य जेवनाचा कार्यक्रम झाल्याचे कळते आणि तेथे सदर परिवार जेवणासाठी गेल्याची माहीती पुढ येत आहे. त्यामुळे नगर परिषद, आरोग्य यंत्रणा, पोलीस विभाग, महसूल विभाग सर्व कामाला लागले. शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील परिसरातील २ घरे कंटेन्मेंट झोन प्रशासनाने जाहीर करून सदर व्यक्तीचा इतर कोणाशी संपर्क आला तसेच व्यक्तीच्या परिवाराचा संपर्क कोणा कोणाशी आला याची शोध मोहीम प्रशासना कडून राबवीण्यात येत आहे. संसर्गाचा आकडा कितीच्या घरात जातो याकडे शहरवासीयांचे व प्रशासनाचे लक्ष्य लागले आहे.