जीवघेण्या हल्ल्यातील युवक मरणासन्न अवस्थेत! कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; कर्ती व्यक्तीच अंथरुणावर: सामाजिक संघटनाही संवेदनाहीन

हिंगणी : येथील बसस्थानक चौकामध्ये लॉकडाऊन काळामध्ये 30 एप्रिल रोजी तीन युवकांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देश्यानुसार दुकाने बंद करण्याची वेळ झालेली आहे, अशी समजूत देणाऱ्या एका युवकावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर त्याला सेवाग्राम, सावंगी रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आले होते. तेव्हापासून युवक मरणासन्न अवस्थेत आहे.

कर्ती व्यक्तीच अंथरुणाला खिळलेली असल्याने कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, एकही सामाजिक संघटना मदतीसाठी सरसावली नाही. हिंगणी येथील गजानन देवराव मोहर्ले या युवकावर तेथीलच तिघांनी आम्हांला का लवकर घरी जाण्यास सांगतो, या क्षुल्लक कारणावरून तलवार, चाकू तसेच लोखंडी रॉडने जबर मारहाण केली होती.

पोलीस तक्रारीनंतर आरोपींना अटकही करण्यात आली होती. गंभीर जखमी गजाननवर सेवाग्राम, सावंगी येथे उपचार करण्यात आले. मात्र, कंबर, हातापायाचे हाड मोडल्यामुळे तो गेल्या तीन महिन्यांपासून खाटेवरून उठलाच नाही. आता हा युवक अखेरच्या घटका मोजत असून कुटुंबातील रोजमजुरी करणारी पत्नी, मुले आणि वृद्ध आई-वडील यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला. आहे. अशा परिस्थितीमध्ये या परिवाराकडे एकही लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संघटना ढुंकूनही पाहायला तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here