पालिकेचा स्वच्छता पंधरवाडा केवळ कागदावरच! पालिकेला लागूनच घाणीचे साम्राज्य

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या पंधरवड्याच्या कालावधीत नगर परिषद सिंदी (रेल्वे) येथे स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये स्वच्छता विषयक तसेच विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. मात्र पालिका हा पंधरवाडा केवळ कागदावर साजरा करत तर नाही ना असे पालिकेपासुन कही अंतरावर असलेल्या बस स्थानकामधील घाणीचे साम्राज्य पाहुन नागरीकांना वाटत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत नगर परिषद सिंदी पालिकेचे मुख्याधिकारी सतिश शेवदा यांच्या मार्गदर्शनात शहरात “कचरा उठाओ” मोहीम राबवित आहे. मात्र शासकीय अधिकारी शासणाच्या लोकोपयोगी योजनांची कशी वाट लावतात यांचे उदाहरनच सिंदी रेल्वे नगर परिषदेने सादर केल्याचे पाहायला मिळते. पालिका हा पंधरवाडा केवळ एखाद्या ठीकाणी कचरा उचलुन थातुर मातुर स्वच्छता करुन भरगच्च फोटोसेशन करुन घेते आणि हे फोटो समंधीत विभागाला तसेच आपल्यापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर टाकुन आम्ही किती आत्मयतेने शासकीय उपक्रम राबविला असा आभास करते.

पालिकेचे मुख्याधिकारी राबवित असलेल्या या फोटो पुरत्या स्वच्छता पंधरवाड्याची शहरात खमंग चर्चा सुरू असुन लाचखोर माजी मुख्याधिकारी कैलास झवर नंतर पालिकेला फोटो इव्हेंट राबविणारे मुख्याधिकारी लाभल्याची चर्चा सिंदीवासीयांकडुन कानावर पडत आहे. शहरात सततधार सुरू असलेल्या पावसामुळे डासांचे प्रमाण लक्षनिय वाढले असुन पालिकेने माजी नगरसेवक अमोल बोंगाडे यांचे मागणीवर दोन महीण्या अगोदर शहरात थातुर मातुर धुळ फवारणी करुन बोळवन केली ही धुळ फवारणी काही भागातील रहीवाश्यांना तर नजरेसही पडली नाही आणि आता तर डासांनी उच्छांद मांडला तरी धुळ फवारणीचा थांग पत्ताच नाही पालिका फक्त आणि फक्त कागदावरच सर्व सेवा पुरवित असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here