सेलू तालुक्यात कोरोणाबाधितांचा आकडा दीडशे पार ! ग्रामीण भागातही शिरकाव ; वाढती संख्या चितेंची बाब

संजय धोंगडे

सेलू : तालुक्यातील हिंगणी पाठोपाठ सेलू, केळझरमध्ये कोरोणाचे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत कोरोणाबाधीताची आकडा दीडशेच्या वर गेला असून दररोज रुग्ण आढळून येत असल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेलू शहरात गुरूवारी दोघांचा अहवाल पाँझेटीव्ह आला तर धानोली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या अँपकाँन कंपनीचे ९ जण पाँझेटीव्ह आढळून आले गुरवारला तालुक्यात २४ रूग्ण आढळून आले. आतापर्यंत तालुक्यात कोरोणामुळे तिन जणांचे प्राण गेले यात दोन हिंगणी तर एक सेलूतील आहे. तालुक्यातील हिंगणी, केळझर, दहेगावगोसावी, धानोली मेघे, महाबळा आणि सिंदी येथेही कोरोणाचे रूग्ण आढळून येत आहे. तालुक्यातील कोरोणाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने आणि तालुक्यात दररोज रूग्ण आढळून येत असल्याने याला नियत्रंण घालण्यासाठी प्रशासनही कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांनी येथे काही गावाला भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगावी नियमांचे पालन करावे व आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत असले तरी लोकांकडून आता सगळे मोकळे झाल्याचे भ्रमात सतर्कता बाळगण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे.

सोशल डिस्टन्सींगचे भान हरपून गेले असून मास्कचाही विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळते तोंडावर मास्क न लावता ट्रिपल, चौबलसिट फिरणाऱ्या फिरस्ती पाहुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संचारबंदीत ही गावागावात चौकाचौकात लोक विशेषत तरूण मंडळी घोळक्याने एकत्र बसून असल्याचे दिसून येत आहे. लोकांच्याही मनात कोरोणाबाबत अनेक समज गैरसमज निर्माण झाले असून टेस्टींग रिपोर्ट वरील विश्वास उडाल्याचे दिसुन येत आहे शासकीय दवाखान्यात आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने लोक सरकारी पेक्षा खाजगीत जाऊन उपचार घेणे पसंत करत आहे त्यामुळे शासकीय रुग्णालयातील ओपीडीमधे रुग्णांची संख्या रोडावल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाने याची कुठेतरी दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here