
सेलू : सेलूतील ग्रामीण रुग्णालयात कोरोणा योध्दा म्हणून काम करणार्या काहींचा सामाजिक कल्याण एवम मानव संरक्षण संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी मात्र येथे सोशल डिस्टन्सींगचे कोनतेही पालन केले गेले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले तर एक दोघांनी मास्क सुध्दा बांधले नसल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यावेळी संपूर्ण स्टाफ मुख्य प्रवेशद्वारावर दाटीवाटीने जमा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे या सामाजिक संघटनेने हा उपक्रम राबवीत संघटनेच्या सक्रीय सदस्यांचे उपस्थीतीत कोरोणाचे काळात कोरोणा योध्दा बनून जीव पणाला लावून माणव संरक्षणाचे काम केले त्या अनुषंगाने सेलू तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालयाचे सर्वाचा कोरोणा योध्दे म्हणून यांचा माणव सेवकाचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला पण येथे आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन केले नाही. संचारबंदीत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या या लोकांचे हे कृत्य अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.