प्रा. शीतल ठाकरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार! अभिनंदनाचा वर्षाव

हिंगणघाट : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी आविष्कार सोशल व एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर द्वारे देण्यात येणारा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० यावर्षी येथील शोभाताई झोटिंग कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शीतल ठाकरे यांना प्रदान करण्यात आला.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित दसरा चौक कोल्हापूर येथे पार पडलेल्या सोहळ्यात ऑनलाइन पद्धतीने हा पुरस्कार देण्यात आला.
शीतल ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळावर वस्त्रशास्त्र व गृह व्यवस्थापन या विषयासाठी कार्य केले आहे.
त्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ प्रा. उषाताई थुटे, डॉ प्रा. सुरेखा देशमुख, डॉ शुभांगी डांगे, प्रांजली डाखोरे, ज्ञानेश्वर चौधरी, परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र चाफले तसेच लोकसाहित्य परिषद, पर्यावरण संवर्धन संस्थेच्या सगळ्या सदस्यांनी, शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here