

बेलगाव : सेलु तालुक्यातील बेलगाव येथे डॉ. पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती येथील कृषिदूत चिराग सुनीलराव खोडके ग्रामीण जागृकता कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात व काही गावात प्रात्यक्षिक
दाखवून शेतकऱ्यांना माहिती देत आहे.
शेतकर्यांकडून काही पारंपारिक शेतीतील पद्धती शिकत आहे व त्यातील बदलाविषयी माहिती शेतकर्यांना देत आहे.
कृषिदूत चिराग खोडके प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना निंबोळी अर्क बनवणे, चारा प्रक्रिया, शंखी भावी उद्रेकीय किड जागृकता व व्यवस्थापन बीज उत्पादनाचे महत्त्व व पद्धत, मृदा आरोग्य व खत व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता व निगा राखणे, फवारणी मात्रा बनवणे, सोयाबीन बीजोत्यापण प्लॉट, शास्त्रीय पद्धत लागवड तंत्र, नर्सरी भेट व चर्चा, शेततळ्याबद्दल उपयुक्त माहीती, बीज प्रक्रिया, माती परीक्षणाचे फायदे एकात्मिक तण व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन पद्धती, शेतीला इंटरनेटशी जुळवून पारंपारिक शेतीत कसा बदल साधता येतो व कृषी संबंधित विविध ॲपचा वापर गुलाबी बोंडअळी बद्दल जागृकता इत्यादीसाठी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करत आहे.
या कार्यक्रमाकरिता कॉलेजचे प्राचार्य डॉ एस एन देशमुख, उपप्राचार्य प्रा. खाडे (कृषीविस्तार शिक्षण), कार्यक्रम समन्वयक श्री कळसकर (वनस्पती रोगनिदानशास्त्र), कार्यक्रम अधिकारी डॉ गावंडे मॅडम (उद्यानविद्या), विषय तज्ञ प्रा. देशमुख (पशु विज्ञान ), प्रा. चौधरीसर( वनस्पति शास्त्र), प्रा. शिंदे मॅडम (कृषिशास्त्र), प्रा.त्रिपाठी मॅडम (कृषी अर्थशास्त्र) प्रा.निंबाळकर मॅडम (कीटकशास्त्र) प्रा.देशमुख मॅडम (मृदा विज्ञान) प्रा.अढाऊ (कृषी अभियांत्रिकी) व प्रा.सोनुकले मॅडम यांनी कृषीदूतला प्रात्यक्षिकांसाठी मदत व मार्गदर्शन करत आहे.
या कार्यात बेलगाव येथील शेतकऱ्यांची कृषीदूतला प्रात्यक्षिकांकरिता चांगले सहकार्य व साथ मिळत आहे.