अत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षांचा सश्रम कारावास! अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्वाळा

वडनेर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रथमेश मंगरूरकर यास न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम करावासाची शिक्षा व 10 हजार दंडाची शिक्षा ठोठावली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल भागवत यांनी दिला. दंड न भरल्यास एक वर्षाच्या अतिरिक्‍त सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

वडनेर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येरनगाव येथे अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय युवक प्रथमेश मंगरूरकर याने अत्याचार करण्याची घटना 8 मार्च 2019 रोजी घडली होती. या प्रकरणात वडनेर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी यासंदर्भात भांदवी 376 पोस्को एक्टसोबत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली होती.

सदर प्रकरण येथील अतिरिक्‍त सत्र न्यायालयात सुनावणीसाठी दाखल झाले. या प्रकरणामध्ये प्रथम शासनाकडून तपास पीएसआय अपेक्षा मेश्राम यांनी केला. तर पोस्को विभागाच्या महिला तपास अधिकारी पीएसआय माधुरी गायकवाड, महिला पोलिस कर्मचारी भावना गहुरकरसह एकूण १९ साक्षीदारांची साक्ष न्यायालयापुढे तपासण्यात आली. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून वरिष्ठ अधिवक्ता दिपक वैद्य तर आरोपीकडून अँड. मून यांनी युक्तिवाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here