भरधाव ट्रकची बसला धडक! एक प्रवासी गंभीर जखमी

वर्धा : बस थांबवून प्रवाशांना उतरवीत असतानाच मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात येळाकेळी सेलू फाट्यावर झाला, याप्रकरणी १९ रोजी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. बापूराव भाऊराव सहारे रा. आजनगाव जि. नागपूर हे त्यांच्या ताब्यातील बस काटोल ते वर्धा येथे आणत होते.

दरम्यान, येळाकेळी सेलू फाट्याजवळ बस थांबवून प्रवासी उतरवीत असतानाच मागाहून भरधाव आलेल्या एम.एच. ३२ क्यू. ३७९१ क्रमांकाच्या बोअरवेल ट्रकचालकाने भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून धडक दिली. या धडकेत सुरेश गोविंद कोल्हे रा. खैरवाडा हा प्रवासी जखमी झाला तसेच बसचे नुकसान झाले. याप्रकरणी सावंगी पोलिसात अपघाताची नोद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here