
वर्धा : माझ्या वडिलांचे नाव पोलिसांना का सांगितले, या कारणातून वाद करीत व्यक्तीस काठीने मारहाण करण्यात आली. पुरपीडित कॉलनी मोरांजणा येथे ही घटना घडली. गणेश महादेव मोरे हा दुकानात उभा असताना वैभव लक्ष्मण महाजन हा तेथे आला आणि त्याने गणेशला तु माझ्या वडिलांचे नाव पोलिसांना का सांगतिले, माझ्या वडिलाला तुम्हीच फसविले, असे म्हणून शिवीगाळ केली. गणेशने शिवीगाळ करण्यास हटकले असता वैभवने काठीने मारहाण केली, याप्रकरणी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.