प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामस्थांना मिळत नाही उपचार! हेकेखोर धोरणावर अंकुश लावण्याची ग्रामपंचायतीची मागणी; जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे तक्रार

पवनार : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातिल वैदयकिय अधिकारी डॉ. रश्मी कपाळे यांच्या मनमानी कारभारामुळे पवनार येथील नागरीकांना कोणत्याही प्रकारचा उपचार मिळत नाही त्यांची हेळसांड व उद्धट वागणुक दिल्या जात असल्याची चौकशी करुन समज द्यावा अशी तक्रार येथील ग्रामपंचायतीने आपल्या ठरावातून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांना केली आहे.

गेल्या काही दिवसापासुन पवनार गावात जागतिक महामारी कोवीड_19 रोगाचे थैमान सुरू असुन पवनार गाव त्यात होरपळुन निघत आहे. अश्या स्थितीत पवनार येथील आरोग्य यंत्रणेच्या भुमिका बाबत गावक-याच्या मनात रोष निर्माण झालेला आहे. या पत्राव्दारे ग्रामपंचायतीने याकडे अधिकार्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

पवनार येथे असलेल्या परीस्थिती नुसार वैदयकिय अधिकारी डॉ. रश्मी कपाळे मुख्यालयी हजर राहत नाही. ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्याबाबत काही योजना राबवयाच्या असल्यास नेहमी असहकार्याची भावना ठेवुन ग्रा.प. कमीटीला विश्‍वासात घेत नाहीत. लोकप्रतिनीधी सोबत नेहमी उघ्दट भाषा, कामाच्या व्यापाबाबत जाहीर प्रदर्शन करणे परंतु कार्यालयात भेट दिली असता कोनतीच कामे करीत असल्याचे दिसत नाही.

एखादया सभेत लोकप्रतिनिधीनी सुचना केल्यास त्याचा विचार न करता त्यांनी सुचविलेल्या कामाकडे मुद्दाम दुलर्क्ष करतात. गावात फार मोठया प्रमाणात रूग्ण संख्या आल्यानंतर सुध्दा कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नाही. रूग्णांना योग्य वेळेत औषध उपचार सुध्दा देण्यास हयगय करणे कोरोना मुळे गावात 4 मुत्यु झाले आणि काही मुत्यू संशयीत कोरोना असुन सुध्दा गावात कुठल्याही प्रकारची जागरूकता करण्यात आलेली नाही.

ग्रामस्थांना गावातच लसीकरनाची व्यवस्था व्हावी म्हणुन डॉ. रश्मी कपाळे यांचे सागणे वरून गावात लसीकरणासाठी ग्रामपचायतच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या परतु लसीकरण सुरू करण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही याउलट ग्रामपचायतने स्वत: खर्च करून जेष्ठ नागरिकाना लसीकरणासाठी वर्घेला न्यावे लागले. गावातील आशा वर्कर यांना ग्रामपंचायतच्या विरूघ्द भडकवुन आरोग्यासंबंधीत कामात मोबदल्याची मागणी करायला सागणे व भडकावने असे प्रकार त्यांच्याकडून होत आहे.

या कामचूकार वैदयकिय अधिका-याचा हेकेखोर धोरणावर अकुश लावण्यात यावा अन्यथा या गावात होणा-या आरोग्याच्या समस्येबाबत आपल्या विभागावार प्रश्‍नचिन्हे निर्माण होईल असेअस या निवेदनात म्हण्टले आहे. प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करावी अन्यथा सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.

………………………

  • वेळेचे काही बंधन नाही केंद्र कधिही होते बंद
  • येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हग्रामस्थांकरीता पाढरा हत्ती ठरला आहे. येथील ग्रामस्थांना या केंद्रातुन कोणत्याही प्रकारचा उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. येथील अधिकारी आपल्या मनमर्जीने कारभार हाकतांना दिसतात अनेकांना उद्धट वागणुक दिल्याचे सामोर आले आहे. हे आरोग्य केंद्र २४ तास सेवा देणारे असले तरी अधिकार्याच्या मनात येईल तेव्हाच कुलूप लावून केंद्र बंद केले जातेत त्यामुळे उपचाराकरीता येणार्या रुग्णांना आल्यापावली परत जावे लागते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here