शिवीगाळ करण्यास हटकले! युवतीस बदडले; पोलिसांत तक्रार दाखल

कारंजा : शिवीगाळ करण्यास हटले असता मद्यपीने युवतीस मारहाण करीत जखमी केले. जऊरवाडा येथे ही घटना घडली. अरविंद शरमते हा नेहमी प्रीती नामक युवतीला शिवीगाळ करीत असे. तिने त्यास शिवीगाळ करण्यास हटकले असता मद्यधुंद अरविंदने प्रीतीचे केस ओढून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कारंजा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here