मद्यपीची विनाकारण व्यक्तीस काठीने मारहाण

हिंगणघाट : मद्यधुंद व्यक्तीने विनाकारण वाद करीत व्यक्तीच्या डोक्यावर काठीने मारहाण करीत जखमी केले. बऱ्हाणपुरे महाराज मंदिराजवळ मांडगाव येथे ही घटना घडली. संजय रामदास दानव हा मंदिराकडे जात असताना रोशन शंकर बावणे हा मद्यप्राशन करून आला आणि मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करू लागला. संजयने त्यास हटकले असता रोशनने विनाकारण काठीने संजयच्या डोक्यावर मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here