

कारंजा (घा.): भरधाव मालवाहूने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील सावळी खुर्द, जवळ झाला. दीपक ताराचंद घागरे रा.सावळी (बु) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दीपक घागरे हा दुचाकीने कारंजाकडे येत होता. भरधाव दूचाकी सावळी (खुर्द) परिसरात आली असता, भरधाव असलेल्या एम. एच. ३० बी. डी. ४०७० क्रमांकाच्या मालवाहूने दुचाकीला जबर धडक दिली. यात दीपक घागरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे. शिवाय पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे, दीपक याचा मंगळवारीच वाढदिवस होता. या घटनेमुळे घागरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. शिवाय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.