वहिवाटीचा रस्ता मोकळा करा! मजरा, कासारखेडा येथील शेतक-यांची मागणी

खरांगणा (मोरांगणा) : शेतात जाणा-या वहिवाटीच्या रस्त्यावर नालीचे बांधकाम करून शेतक-यांची वहिवाट बंद केली. त्यामुळे नजिकच्या मजरा व कासारखेडा येथील शेतक-यांनी इंजिनिअर यांच्याकडे वहिवाटीचा रस्ता मोकळा करा, अशी मागणी केली आहे.
आमची मजरा व कासारखेडा येथील शेतक-यांचा शेतात जाण्याकरिता वहिवाटीचा रस्ता नाल्यातून असल्यामुळे ये-जा व शेतातील माल आणण्याकरिता बैलबंडी व ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतो. परंतु, गावातील रोडचे व नालीचे काम वहिवाटीच्या पुलापर्यंत आल्यामुळे शेतक-यांना नाल्यातून रोडवर येण्याकरिता त्रास सहन करावा लागतो.
शेतक-यांनी त्रिनीवा कंपनीचे व्यंकटेश व इंजिनिअयर संपत यांना वारंवार या रस्त्याबद्दल चर्चा केली. मात्र, नालीचे बांधकाम वहिवाटीच्या रस्त्यावर आल्यामुळे रस्ता बंद झाला. त्यामुळे शेतक-यांची बैलबंडी व वहिवाट बंद झाली. त्यामुळे मजरा व कासारखेडा येथील शेतक-यांनी शेतामध्ये जा-येण्याकरिता रस्ता करून द्यावा, हे सांगण्याकरिता गेले असता इंजिनिअर संपत यांनी एेकून न घेता शेतक-यांना शिविगाळ केली.
त्यामुळे येथील शेतक-यांनी शेतातील वहिवाटीचा रस्ता माेकळा करा व इंजिनिअर यांंना आवरा, अशी मागणी यावेळी प्रशांत लाकडे, अनिल ठाकरे, गिरधारी व्यास, केशव काळे, पांडुरंग डुडुकार, वासुदेव लिचडे, रघुनाथ रुईकर, मनोज रुईकर, चंद्रशेखर रुईकर, श्रावण पचारे, सचिन डुडुरकार, सतीश लिचडे, श्‍याम बोंदरे, राजू खाडे, बंडू झोड, रमेश बोंदरे, प्रवीण बोंदरे,विशाल व्यास, विनोद झोड, सुभाष झोड, मुरलीधार बोंदरे, केशव फाळके, विनोद लाकडे, अशोक लाकडे, माधोराव सहारे, हिरामण महाजन, तळशीराम गायकवाड आदींनी केली आहे.
————–
मालाचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण?

सध्या सोयाबीन पिकाची सोंगणी सुरू झाली असून शेतक-यांचा माल घरी जाण्याची वेळ आहे. त्यातच रस्ता बंद असल्यामुळे शेतातून घराकडे माल कसा न्यावा, असा प्रश्‍न शेतक-यांसमोर आहे. यामुळे त्रिनीवा कंपनीने या रस्तामुळे मालाचे नुकसान झाल्यास कंपनीने जबाबदार राहतील काय? असा सवाल शेतक-यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here