वर्धा : तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत सामान्य रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभागाने समद्रपूर तालुक्यातील 11 तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पानटपरीवर कारवाई केली असून त्यात 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉ.नम्रता सलुजा, समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) जयंत वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत लोहार व कर्मचारी तसेच समुद्रपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रविण काळे यांच्या नेतृत्वात जितेंद्र वैद्य, सचिन भडे यांनी कार्यवाही पार पाडली.