खासदारांच्या घरासमोर ‘प्रहार’चे आंदोलन! बाळा जगताप यांच्या नेतृत्वात ठिय्या

आर्वी : गेल्या तीन-चार वर्षांपासून आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम थंडबस्त्यात आहे. सदर काम प्रगतीपथावर येवून पूर्ण व्हावे, याकरिता प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात सातत्याने आंदोलन सुरू आहे. मात्र, निष्ठूर प्रशासन व निद्रीस्त लोकप्रतिनिधी अजूनही धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर निघायला तयार नाही. त्यामुळे शनिवारी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहारने ठिय्या आंदोलन केले.

आर्वी-तळेगाव रस्त्यासाठी बाळा जगताप यांनी आंदोलन सप्ताहाचेसुद्धा आयोजन केले होते. त्यात रस्ता रोको, ऑपरेशन ब्लॅक आऊट, सहित लोकप्रिनिधींना प्रतिकात्मक श्रद्धांजलीसुद्धा वाहण्यात आली. मात्र, तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे शनिवारी 26 मार्चला खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. काम मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू राहील, हा प्रश्‍न आता तडीस लावल्याशिवाय माघार नाहीच, अशी भूमिका बाळा जगताप यांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here