

वर्धा : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही जागेवर भाजपचा विजय झाल्याने पवनार येथे बजरंग दलाच्या वतीने आज सायंकाळी 7 वाजता विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जय श्री रामाचा जयघोष करण्यात आला. आर. एस एस, विश्व हिंदु परिषद, बजरंग दलच्या वतीने महाराष्ट्रात राबविल्या मोहीममध्ये शत प्रतिषत मतदान, माहा आरती, प्रतेक प्रखंड स्थानी सभा घेण्यात आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यात चारही जागेवर भाजपचा विजय झाला. विजयाचा जल्लोष करित पवनार गावातून फटाक्यांची आतीषबाजी करीत रॅली काढण्यात आली.
विजयी रॅलीला हनुमान मंदिर येथून सुरुवात करून रॅलीने गावातून मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, पवनार शाखा प्रमुख पंकज नेहारे,निलेश वाघमारे, गजू लोहकर, गणेश खेलकर, सौरव स्वर्गे, भारत बावणे, सागर कावळे, तुशार डोके, गोविंदा मुंगले,साहिल पाहुणे, अलंकार राऊत, बंटी पडघम, गुड्डू मुंगले, बबलू पडघान, आविष्कार देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.