

आर्वी : येथील विश्रामगृह भागातील गोदामाला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच अग्निशमन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी वेळीच घटनास्थळ जाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला असून या आगीत आर्वीचे नगराध्यक्षांची कार थोडक्यात बचावली.
बुधवारी दुपारी ७.३० वाजताच्या सुमारास येथील विश्रामगृहाच्या आवारात कचरा पेटविण्यात आला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत गोदामालाही आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.