हवामान आधिरित फळ पिक विमा योजना! 30 जून अंतिम मुदत; शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन

वर्धा : प्रधामंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावार आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार) वर्धा जिल्हयात लागू झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सदर योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी एच्छिक आहे. तसेच अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. 30 जून पर्यंत शेतकऱयांनी विमा हफ्ता भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 50 टक्के विमा हप्ता भरावयावा असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसुचित फळपिकासाठी 4.00 हे क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणीची मुभा देण्यात आली आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू असुन अधिसुचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच हंगामाकरीता विमा संरक्षाणासाठी अर्ज करता येणार आहे. सदर योजना वर्धा जिल्हयात राबविण्याकरीता एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीची निवड झाली आहे.

वर्धा जिल्हयातील आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव, कारंजा तालुकयातील कारंजा, सारवाडी, कन्नमवार ग्राम, ठाणेगाव या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोसंबी पिकासाठी विमा योजनेत सहभागी होता येईल. तसेच संत्रा पिकासाठी आर्वी तालुक्यातील आर्वी, रोहणा, खरांगणा, बाढोणा, व आष्टी तालुक्यातील आष्टी , तळेगाव, साहूर तसेच कारंजा तालुक्यातील कारजा,ठाणेगाव,सारवाडी, कन्नमवारग्राम देवळी तालूक्यातील देवळी व पुलगाव या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येईल. तसेच पिकासाठी आर्वी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, खरांगणा व आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव तसेच कारंजा तालुक्यातील कारंजा, ठाणेगाव , कन्नमवारग्राम, सारवाडी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येईल.

विमा हप्ता रक्कम आपल्या बँक खात्यात अर्जासह जमा करावा

मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये, विमा हप्ता 4 हजार रुपये, संत्रा पिकासाठी संरक्षित रक्कम 80 हजार रुपये विमा हप्ता 4 हजार रुपये, लिंबु पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 70 हजार रुपये, विमा हप्ता 3 हजार 500 रुपये आहे. जास्तीत जास्त शेतकऱयांनी याचा लाभ घेऊन पिकाचे संरक्षण करावे असे जिल्हा कृषि अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here