

पवनार : धारदार शस्त्राच्या धाकावर चौघांना लूटल्यानंतर दुसऱ्या दिवशी पून्हा या टोळीने याच ठिकाणी येत पवनार येथील दोन नागरीकांना लूटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या रस्त्याने जनाऱ्या नगरीकांनी सावध पवित्रा घेत गावातील नागरीकांशी मोबाईलच्या मांध्यमातून संपर्क करुन वरुड आणि पवनार येथील काही यूवकांना बोलवत यातील तीन हल्लेखोरांना पकडून चांगलाच चोप दिला. राहुल दादाराव जाधव रा. आर्वीनाका वर्धा, अर्जूनसिंग बावरी रा. शिखबेडा सावंगी (मेघे) असे आरोपिंची नावे आहे. ईतर पाच आरोपीमध्ये विधीसंघर्षीत बालकांचा समावेश आहे.
सुनसान रस्ता असल्याचा फायदा घेत या ठिकाणी येत धारदार शस्त्राचा धाक दाखवत या रस्त्याने येणाऱ्या वाटसरुंना लूटण्याचा प्रकार काही दिवसापासून काही तरुणांची टोळी करीत होती. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास या टोळीने याच रस्त्याने जाणाऱ्या डॉक्टरसह चार नागरीकांना जबर मारहान करीत लूटले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात सर्वत्र पसरली.
मात्र मंगळवारच्या रात्री घटना घडवूनही ही टोळी दुसऱ्या दिवशी पून्हा याच ठिकाणी रात्रीच्या वेळी सावज हेरण्यासाठी येवून बसले होते. या रस्त्याने पवनार येथून सेवाग्राम येथे जाणाऱ्या दोन यूवकांना या टोळीने पकडले मात्र त्याच्या तावडीतून सूटका करीत शेतात पळून गेले आणि त्यानंतर पवनार आणि वरुड येथील नागरीकांना याची माहिती दिली लगेच येथील नागरीकांनी घटनास्थळ गाठत या टोळीतील तीन हल्लेखोरांना पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.