ट्रॅव्हल्सच्या धडकेत बसचालक जखमी

सेलु : भरधाव ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडत असलेल्या मालवाहू बसचालकाला धडक दिली. यात बसचालक जखमी झाला. दंडारे टी पॉइंटजवळ हा अपघात झाला. विकास जयदेव कळंबे आणि रूपेश नंदागवळी हे दोघे एमएच.०७ सी.७५४६ क्रमांकाच्या मालवाहू बसने जात होते. दरम्यान, त्यांनी बस थांबवून ते रस्त्याकडेला चहा टपरीवर चहा घेऊन परत बसकडे जात असताना एम.एच.3२ एटी. ६३९९ क्रमांकाच्या ट्रॅब्हल्सने धडक दिली. यात रूपेश नंदागवळी जखमी झाला. या प्रकरणी सेलु पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here